अकाेला : गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनचा पेरा अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola farmer Soybean sowing

अकाेला : गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनचा पेरा अधिक

रिसोड : सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक झाले असून यावर्षी जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ६०० हेक्टर वर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. यावर्षी गतवर्षी पेक्षा जास्त अष्टसूत्रीचा वापर होणार आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला असून खरीप पेरणीची लगबग वाढली आहे. काही ठिकाणी तर पेरणीला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापासून सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक झाले आहे.

हमखास उत्पादन देणारे पीक असल्यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होत आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्यामुळे या पिकाविषयी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सोयाबीन उत्पादकता वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. सोयाबीनची एकरी उत्पादकता सरासरी आठ क्विंटल आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सरासरी उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बीबीएफ, सरी-वरंबा बेडवर सोयाबीनची टोकण यासारखे नवनवीन प्रयोग करून सोयाबीनची सरासरी उत्पादकता १० ते १२ क्विंटल पर्यंत नेण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. खास सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी वाशिम जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांनी मागील वर्षी सोयाबीनची अष्टसुत्री तयार केली होता.

या अष्टसूत्रीचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यामुळे अष्टसूत्री पाच भाषांमध्ये रूपांतरित होऊन संपूर्ण देशात पोहोचली आहे. अष्टसूत्रीचा शेतकऱ्याला कळली असून यावर्षी जवळपास सर्वच शेतकरी अष्टसूत्रीचा वापर करीत आहेत. यावर्षीही ही इतर पिकांना फाटा देत शेतकरी सोयाबीन या पिकाकडे वळला असून तालुक्यात ५८ हजार हेक्टरवर तर जिल्ह्यात ३ लाख ४ हजार६०० हेक्टर वर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे.

जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. सोयाबीन बियाण्याची ५ से.मी .खोलीवर पेरणी करावी तसे केल्यास उत्पादकतेत निश्चित वाढ होते. तसेच जे शेतकरी सोयाबीन बरोबर तुरीचे आंतरपीक घेतात त्यांनी बियाणे बीजप्रक्रिया करून वरंब्यावर टोकण पद्धतीने लागवड केल्यास तूर उधळण्याचे प्रमाण कमी होऊन मर्यादित रूप संख्या असल्याने उत्पादनात चांगली वाढ होते. कृषी विभागाकडून गावपातळीवर बिज प्रक्रियेपासून तर लागवडीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे.

- शंकर तोटावार,जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम.

Web Title: Akola Farmer Soybean Sowing Higher Than Last Year Agriculture Crop

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top