अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणात पात्र, अपात्र निर्णय निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक गुरुवारी (ता. ७) जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरण ठेवण्यात आली. .यापैकी निकषात न बसणाऱ्या ९ प्रकरणाला अपात्र ठरविण्यात आले, तर सहा प्रकरणांच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सततची नापिकी, सावकार किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज, उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्च अधिक व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत..Akola News: बंदुकीच्या धाकावर सराफा दुकानात दरोडा; पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप, व्यापारी संघटनांकडून टीका.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एका लाखाची मदत देण्यात येते. संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रकरण निश्चित करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली..बैठकीत एकूण १५ प्रकरण ठेवण्यात आले. त्यापैकी ६ प्रकरण शासकीय मदतीसाठी पात्र करण्यात आले, ९ प्रकरण अपात्र ठरले. जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी समितीमधील अध्यक्ष जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे मॅनेजर, महिला व बाल विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व इतरांची उपस्थिती होती..Premium|Jodhpur Family Trip : निवांत गप्पा आणि मेहरानगढची भव्यता; जोधपूरमधील एका कौटुंबिक सहलीचा सुखद अनुभव.असे आहेत पात्र प्रकरणओम गोपाल नंदाने (वय १८, रा. निराट, अकोला), सुनील सूर्यभान डोंगरे (वय ५५, रा. पाळोदी, अकोला), प्रवीण भगवानराव खंडारे (वय ५४, रा. वरोडी, ता. अकोला), आतीष रमेश शेगांवकर (४५, रा. गोरेगाव बु. अकोला), शंकर रामदास पुंडे (३५, रा. माझोड, अकोला), राजेंद्र पुरूषोत्तम सोनखासकर (वय ४८, रा. सावरा, अकोट)..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.