Akola : वडिलांना भेटण्यास आलेल्या तृतीयपंथीयास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

Akola : वडिलांना भेटण्यास आलेल्या तृतीयपंथीयास मारहाण

देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) : आजारी वडिलांना भेटायसाठी आलेल्या तृतीयपंथ्यास वडिलांसह सावत्र आई व सावत्र भावाने मारहाण करून अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली व दगड मारून कारच्या समोरील काच फोडून नुकसान केले. एवढेच नव्हे तर तृतीयपंथीय असल्याबद्दल घाणेरड्या भाषेत बोलून अपमानित केल्याची घटना तालुक्यातील जुमडा येथे आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.दरम्यान पोलिसांनी वडिलांसह सावत्रआई व भावा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी निकिता नारायण मुख्यदल तृतीयपंथीय असून पिंपरी चिंचवड तालुक्यातील वाल्हेकर वाडी चौकात राहते. याबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. फिर्यादी आपल्या सख्खा भाऊ संतोष नारायण मुख्यादल राहणार सावखेड तेजन याच्यासोबत वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी तालुक्यातील जुमडा येथे आले होतें त्या वेळीं गैरअर्जदार सावत्र आई विमलबाई व भाऊ रवी  याने तू तृतीयपंथी आहे इथं आमच्या घरी का आला.

आमची बदनामी होते असे बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सावत्र आई व वडील यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व केस धरून ओढले. सावत्र भाऊ रवी याने कार च्या समोरील काचेवर दगड मारून ४ हजार रुपयाचे नुकसान केले. व जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत निकिता नारायण मुख्यादल वय ३५ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वडील नारायण दशरथ मुख्यादल विमल नारायण मुख्यादल व रवी नारायण मुख्यादल राहणार जुमडा या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात बीट जमदार रामेश्वर जायभाये तपास करीत आहे.

Web Title: Akola Father Meet Gir Beating By Father Mother Brother Filed A Case Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..