
अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचना अंतिम केली. प्रभाग रचना जैसे थे असल्याने काहींना राजकीय दिलासा तर काहींची धाकधूक वाढली आहे. प्रभाग रचनेवर शिक्कामाेर्तब झाल्यानंतर आता इच्छुकांचे लक्ष आरक्षण प्रक्रियेकडे लागले आहे. जि.प. मध्ये ५२ सर्कल (मतदारसंघ) आहेत. आरक्षण निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग येणार आहे.