अरे देवा ! कोरोना योद्ध्यालाच कोरोना ने ग्रासलेच; या गावात झाली कोरोनाची एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

तपासणी केल्यानंतर ते औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे निघून गेले, त्यांनंतर डॉक्टरला आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे 19 जून रोजी कळाले असता, त्यांनी कोरोना आजारावर औरंगाबाद येथे एका रुग्णालयात उपचार घेणे सुरू केले असल्याची माहिती समोर आली. मात्र, डॉक्टरने गावात त्या दरम्यान, किती रुग्ण तपासले त्यांचा शोध आरोग्य प्रशासन दैनंदिन रुग्ण तपासणी रजिस्टर वरून घेत असल्याची माहाती मिळाली आहे.

बोरगाव मंजू (जि. अकोला) : अकोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर येत असलेल्या बोरगाव मंजू येथे 55 वर्षीय पहिला  कोरोना बाधित रुग्ण आढळला असून, तो व्यवसायाने खासगी डॉक्टर आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायत, पोलिस, आरोग्य विभाग या यंत्रणा सतर्कतेने कामाला लागली आहे. मात्र, गावातील जनतेने आता तरी  जागरूक होऊन नियमांचे पालन करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

क्लिक करा- नागरिकांनो सावधान! सायबर गुन्हेगारांनी काढले डोकेवर; शोधली एक नवीन युक्ती

स्वतःहून पाठविले स्वॅब
शुक्रवारी सकाळी तपासणी अहवालात अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू गाव दिसतात गावात सर्वत्र चर्चेला उधाण आले.  त्यानंतर आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली की, अहवालात आलेला कोरोना बाधित पहिला रुग्ण गावातील 55 वर्षीय खासगी  डॉक्टर असल्याचे समोर आले.

त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे, डॉ. हर्षल ढेकळे, ठाणेदार हरिष गवळी,  जिल्हा परिषद सदस्य नीता गवई, सरपंच चंदा खांडेकर, ग्रामविकास अधिकारी विलास देऊळकार, सेवक संदीप गवई, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ देशमुख, उपसरपंच मो. हकीम, वासिक पटेल यांनी पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या भागात जाऊन  नातेवाईकांसोबत चर्चा करून त्या रुग्णाचा आढावा घेतला असता बाधित रुग्ण खासगी डॉक्टर हे सात दिवसापासून टायफाईड आजाराने ग्रस्त होते, त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी स्वतः अकोला शासकीय महाविद्यालयात स्वॅब तपासणी केली. 

हेही वाचा- शिक्षकांसाठी शाळा 26 पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश

औरंगाबादमध्ये उपाचार घेत असल्याची माहिती
तपासणी केल्यानंतर ते औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे निघून गेले, त्यांनंतर डॉक्टरला आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे 19 जून रोजी कळाले असता, त्यांनी कोरोना आजारावर औरंगाबाद येथे एका रुग्णालयात उपचार घेणे सुरू केले असल्याची माहिती समोर आली. मात्र, डॉक्टरने गावात त्या दरम्यान, किती रुग्ण तपासले त्यांचा शोध आरोग्य प्रशासन दैनंदिन रुग्ण तपासणी रजिस्टर वरून घेत असल्याची माहाती मिळाली आहे तर, आरोग्य कर्मचारी विलास खडसे, श्रीमती केदार, दीपाली मालवे, आशा गट प्रर्वतक वर्षा ढोके यांच्यासह 13 आशास्वयंम सेविका, नऊ अंगणवाडी सेविका यांनी संबंधित परिसरातील घरोघरी जाऊन आरोग्य विषयक सर्वेक्षण केले. या दरम्यान, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 16 जणांना सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समोर आली आहे.

ग्रामपंचायतने केली त्वरित फवारणी
गावातील कोरोना बाधित डॉक्टर ज्या परिसरात वास्तव्य आहे आणि, जेथे त्यांचे क्लिनिक आहे त्या परिसरासह संपूर्ण परिसरात कोरोना आजारावर प्रभावी अशा निर्जंतुकीकरण औषधची फवारणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

आता तरी नियमांचे पालन करा
तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग हे कोरोना आजाराला आपल्यापासून कोसो दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय आहे, पण ज्या प्रकारे शासनाने थोडी सूट देताच अनेक लोक अजूनही विना मास्कचे मनमोकळे फिरत असल्याचे बघायला मिळत आहेत मात्र, गावात पॉझिटिव्ह रुग्ण खासगी डॉक्टर असल्याने त्यांनी किती लोकांना यादरम्यान रुग्ण सेवा दिली आणि त्यातील किती लोक अजूनही बिनधास्त पणे गावात मोकळे फिरत असतील तर, ही पुन्हा एकदा बोरगाव मंजू वासियांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola The first positive patient found in Borgaon Manjut