

Akola
esakal
अकोला: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून अनेक भागांत पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एकूण ८३ गावांना पुराच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला असून महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, आरोग्य, ग्रामपंचायत आणि संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.