Akola News: तीव्र उन्हात महापालिकेवर वंचितचा ‘घागर मोर्चा’; हद्दवाढ भागातील नागरिकांचा आक्रोश; मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Citizens Stage Ghagar March in Akola Amid Heat: पाणीपुरवठा अपुरा, स्वच्छतेचा अभाव, कुत्र्यांची समस्या, मच्छर वाढीवर नियंत्रण यासह मूलभूत सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा दिला.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली हद्दवाढ भागातील नागरिकांनी शुक्रवारी (ता.२४) महानगरपालिकेवर ‘घागर मोर्चा’ काढत प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गांधी-जवाहर बाग येथून निघालेला हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. दुपारी १२ ते १ या वेळेत भर उन्हात शेकडोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले होते. काही काळ आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com