

Akola Gupta Flour Mill Robbery
esakal
अकोला: शहरातील रायली जीन परिसरातील गुप्ता फ्लोअर मिलमध्ये सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. विश्वासाने कामावर ठेवलेल्या कामगारांनीच मालकाचा विश्वासघात केल्याचा आरोप असून, मालकाचे हातपाय बांधून त्यांना मारहाण केल्यानंतर रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य असा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन कामगार पसार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, व्यापारी व उद्योजकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.