पत्नीला त्रास देणाऱ्या पतीस तीन वर्षांचा कारावास

महिलेचा शारिरीक व मानसिक छळ
Sexual Harassment
Sexual Harassmentsakal

अकोला : जुने शहरातील शिवनगर येथे महिलेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीला दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा (Sessions Judge Anil Kumar Sharma) यांच्या न्यायालयाने पतीस तीन वर्षे कारावास व एक हजार दंडाची शिक्षा सुनावली.

Sexual Harassment
जळगाव : जानेवारी अखेरपर्यंत होणार भरडधान्य खरेदी

जुने शहरातील भारत थेटे (रा. शिवनगर) याचे लग्न वामन पडोळे (रा. रौंदळा, ता. तेल्हारा) यांची मुलगी अनुराधा हिच्या सोबत २०११ मध्ये झाले होते. सुरूवातीला सासरच्या मंडळीने मृतक अनुराधा हिला चांगले वागविल्यानंतर सासरकडील मंडळी व नवरा भारत, सासू लक्ष्मी थेटे यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे हुंडा न दिल्यामुळे पुन्हा २० हजार घेवून ये असे म्हणून अनुराधाला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. अनुराधाने सासरच्या त्रासाला कंटाळून स्वतः ला जाळून घेतल्याने १७ जानेवारी २०१३ रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Sexual Harassment
नांदेड मारतळ्यात अवैध बायोडिझेलची विक्री

मृत्यूपूर्व बयानामध्ये तिने नवरा भारत सोबत हुंड्यासाठी भांडण झाल्याने जाळून घेतल्याचे सांगितले. मृतक अनुराधाचे वडील वामनराव यांच्या तक्रारी वरून जुने शहर पोलिसांनी आरोपी विरुद्व कलम ४९८-अ, ३०४-ब नुसार गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. न्यायालयाने पतीला दोषी ठरवत तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास शिक्षेत वाढ करण्याचे प्रावधान ठेवले. सरकार पक्षाची बाजू राजेश्वर एस. रेलकर यांनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com