Akola District Faces Heat Wave from April 25–27: जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हात बाहेर जाणे टाळण्याचे, पुरेसे पाणी प्यावे, लहान मुले व पाळीव प्राणी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
अकोला: जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.