

Akola News
esakal
अकोला: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून तापमानामुळे तीव्र उष्णतेचा कहर झालेला असून ४२ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान नोंदवले जात आहे. या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ सर्वसामान्य जनजीवनालाच नव्हे तर शेती पिकांनाही मोठ्या प्रमाणात बसतो आहे. विशेषतः केळी पिकावर या हवामान बदलाचा गंभीर परिणाम दिसून येत आहे.