

Akola News
esakal
अकोला: एप्रिल महिन्याच्या मध्यातच शहराचे तापमान ४४.२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट जाहीर करण्यात आली. अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर असताना महानगरपालिकेच्या टिळक रोडवरील भरतीया हॉस्पिटलमध्ये जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. उष्णतेच्या तडाख्यात नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत असून मनपा प्रशासन प्रचंड असंवेदनशील दिसून येत आहे.