

Akola News
esakal
अकोला: विदर्भासह अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असताना मंगळवारी (ता.१९) जुने शहरातील असदगड किल्ला परिसरात एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरेशसिंग ठाकूर (वय ५०) असे मृतकाचे नाव असून, प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी अकोल्याचे तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.