Akola News : नुकसानीच्या सहा महिन्यांनंतर अकोला जिल्ह्यात मदत जाहीर

अकोला जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
compensation
compensationSakal

अकोला - जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.

प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर तब्बल सहा महिन्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च व एप्रिलमध्ये नुकसान झालेल्या ५९५ शेतकऱ्यांना ७८ लाख ३५ हजारांचा निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

जिल्ह्यात मार्च महिन्यात ६, ७ मार्च व ९ आणि १५ ते १९ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली होती. त्यामुळे फळबागा व रब्बी हंगामातील गव्हासह अन्य पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ७ ते ९ एप्रिल दरम्यान सुद्धा अवकाळी पावसाने झोडपले होते. गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

रब्बी हंगामात हाता तोंडाशी येणारा घास पावसाने हिरावला होता. फळ बागांना सुद्धा अवकाळीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरु असतानाच एप्रिल महिन्यात पुन्हा २६ ते ३० एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे पातूर, व बार्शीटाकळी तालुक्यात नुकसान झाले होते.

सर्वाधिक नुकसान एकट्‍या पातूर तालुक्यात झाले होते. या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पटवारी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत करण्यात आले. त्यानंतर मदतीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला. परंतु शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली नव्हती.

दरम्यान शासनाच्या महसूल व वन विभागाने संबंधितांना मदतीसाठीचा शासन निर्णय २५ सप्टेंबर रोजी जारी केला. त्यानुसार मार्च व एप्रिलमध्ये नुकसान झालेल्या ५९५ शेतकऱ्यांना ७८ लाख ३५ हजारांचा निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

असे झाले होते शेतकऱ्यांचे नुकसान

- पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ३४ गावांतील ४५५ शेतकऱ्यांचे बागायती पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. ३३५.११ हेक्टरवरील शेती क्षेत्राला त्याचा फटका बसला होता. संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे ५६ लाख ९६ हजार ८७० रुपयांची मागणी करण्यात आली होती.

- अवेळी पाऊस व वादळामुळे २७ गावांतील १४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ९५ हेक्टरवरील फळ पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाकडे २१ लाख ३७ हजार ७२५ रुपयांची मागणी करण्याल आली होती.

या पिकांना बसला होता फटका

अवेळी पावसामुळे बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचेच नुकसान झाले होते. संबंधित तालुक्यातील गहू, ज्वारी, हरभरा, भुईमुग, कांदा, टरबूज यासह पपई, लिंबू, संत्रा व आंबा पिकांचे नुकसान झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com