आजपासून ऑनलाईन भरणार 'अकोल्याची जत्रा'

आजपासून ऑनलाईन भरणार 'अकोल्याची जत्रा'

कोरोनाच्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी पाच रंजक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

अकोला : सर्वत्र कोरोनाचे (Corona Vorus) सावट असल्याकारणाने कमालीचे नैराश्य पसरत चालले आहे. ह्या नकारात्मकतेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी अकोल्याच्या विविध क्षेत्रातील निवडक दिडशे लोकांचा समूह धडपडत असून 'अकोल्याची जत्रा' (Akolyachi Jatra) या पेजवर मनोरंजक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक - सांस्कृतिक क्षेत्रात अकोल्याची प्रतिष्ठा उंचावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ह्या मंडळींनी सुरूवात म्हणून २६ ते ३० मे दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळात विविध रंजक कार्यक्रम आयोजित केले आहेत. (Akola-Jatra-to-be-held-online-from-today)


सुप्रसिद्ध कवी तथा विविध वाहिन्यांवर अकोल्याचे प्रतिनिधित्व करीत असलेले हास्यकलावंत किशोर बळी यांचा भन्नाट विनोदी कार्यक्रम २६ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.

२७ मे ला राष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम हास्य-व्यंग्य कवी घनश्याम अग्रवाल यांची खुमासदार प्रकट मुलाखत आकाशवाणीच्या निवेदिका मीनाक्षी पाटील घेणार आहेत.

२८ मे रोजी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शरद वानखडे विनोदी शैलीत भूत-प्रेत,भानामती,करणी,काला जादू इ.संदर्भात प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.

२९ मे रोजी मराठी गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असुन प्रसिद्ध गझलकार अमोल शिरसाट सूत्रसंचालन करणार आहेत.

गझलकार निलेश कवडे आणि अमोल गोंडचवर या मुशायऱ्यात सहभागी होणार आहेत.

३० मे रोजी रविवारी 'हृदयी वसंत फुलताना ...' ह्या मराठी - हिंदी चित्रपटगीतांच्या मैफिलीत साहेबराव मोरडे(गायक), प्रगती खंडारे(गायिका), विपुल गवई(की-बोर्ड),विशाल इंगळे(ढोलक),यश कदम (अॉक्टोपॕड) इत्यादी कलावंत सहभागी होणार आहेत.


फेसबुकवरील 'अकोल्याची जत्रा' हे पेज लाइक करून या कार्यक्रमांचा रसिकांनी सहपरिवार अवश्य आनंद घ्यावा असे आवाहन अकोल्याच्या जत्रेतील राजश्री देशमुख, नयना देशमुख, अजय गावंडे, डॉ.आर.बी.हेडा, ऍड.मोतीसिंग मोहता, विजय कौसल, संध्या देशमुख, देवश्री ठाकरे, हेमलता वारोकार,नरेंद्र चिमणकर, डॉ. निलेश पाटील, पूजा काळे, श्याम ठक, मीनाक्षी फिरके, विद्या राणे, चंद्रकांत पाटील, उमेश अलोणे, विशाल बोरे, तुलसीदास खिरोडकर, संजय जोशी, सुनील जानोरकर, संजय पाटील, विशाल मोरे, ऍड.अरुणा मानकर, अनिता कवळे, स्वानंदी पांडे, शिवाजी भोसले, प्रीती पचगाडे, वैशाली पाटील, किरण पवार, संतोष ताले, ऍड.अनिल लव्हाळे, भूषण सराग, प्राजक्ता जाधव, कुणाल शिंदे, विपुल माने,आशिष कसले, बबलू तायडे, वैष्णवी दातकर, वर्षा पोरे, नंदा देशमुख, स्वप्नील तायडे, आरजे गौरव व चंद्रकांत झटाले यांनी केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

'Akola Jatra' to be held online from today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com