अकोला : नोकरीच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

job fraud in Akola

अकोला : नोकरीच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक

अकोला : इंडोनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अकोल्यातील लोकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी युवक-युवतींनी खदान स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.

इंडोनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने अकोला येथील आरटीओ ऑफिस रोडवर कार्यालय उघडले. त्यानंतर वृत्तपत्रात नोकरीची जाहिरात दिली. या जाहिरातीतून युवक-युवतींनी कार्यालयात जाऊन भेट घेतली असता त्यांना १५ हजार रुपये पगार देण्याचे आमिष दाखवले. या कार्यालयात अंकुश काकड (रा. मोरगाव काकड), अनुप प्रधान, अंकित शराफ, सतीश मोदीकर कार्यरत होते.

यांनी युवकांना नोकरीच्या नावाखाली कंपनीत जॉईन होण्यासाठी १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतीच रक्कम भरण्याचे सांगून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर पैसे जमा करणाऱ्या युवकांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन रोजगार मागितला असता त्यांना रोजगार देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे युवक-युवतींनी पैसे परत करण्याचा तगादा कर्मचाऱ्यांच्या मागे लावला. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करून धमकावणे सुरू केल्याचे युवक-युवतींनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हा फसवणुकीचा प्रकार सागर वाघ, निखिल तायडे यांनी समोर आणला असून, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने युवक-युवतींनी खदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. घडलेल्या प्रकाराची आपबिती आमदार रणधीर सावरकर यांच्या कानावर टाकल्याने त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फसवणूक झालेल्या झालेल्या युवक-युवतींची संख्या १५० च्या आसपास असल्याची माहिती आहे.

Web Title: Akola Job Fraud Youth Cheated Indonesia India Marketing Pvt Ltd Accused

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top