सावधान! मोबाईलवरून बँक खात्याची माहिती देत असाल तर पडू शकते महाग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

चोरांनी फसवणुकीची नवीन शक्कल शोधून काढली आहे. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करीत कर्जाचे हप्ते स्थगित करण्यासाठी मोबाईलवर आलेले ओ.टी.पी. क्रमांक विचारत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यात असलेली रक्कम काढून घेण्याचे प्रकार वाढत असून, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांनी केले आहे.

कारंजा -लाड (जि.वाशीम)    ः चोरांनी फसवणुकीची नवीन शक्कल शोधून काढली आहे. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करीत कर्जाचे हप्ते स्थगित करण्यासाठी मोबाईलवर आलेले ओ.टी.पी. क्रमांक विचारत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यात असलेली रक्कम काढून घेण्याचे प्रकार वाढत असून, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांनी केले आहे.

चोरांनी फसवणुकीची एक नवी शक्कल काढली आहे. ग्राहकांना त्यांचे मोबाईलवर फोन करून बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली जात आहे. कर्जाचे हप्ते स्थगित करण्यासाठी त्यांचे मोबाईल क्रमांकावर आलेले ओटीपी विचारत आहेत. त्यानंतर, ग्राहकांच्या खात्यामध्ये आलेली रक्कम काढून घेतली जात आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अशीच एक घटना कारंजा तालुक्यातील रवि गुल्हाने यांच्यासोबत नुकतीच घडली असून, त्यांच्या खात्यामधील रक्कम चोरांनी लंपास केली. त्यामुळे खबरदारी म्हणून, अनोळखी नंबरवरून असे मॅसेज किंवा कॉल आल्यास त्यांनी विचारलेली माहिती सांगू नये. बँक फोनद्वारे ओटीपी किंवा बँक खातेशी संबंधित इतर गोपनीय माहिती विचारत नाही. बँक खात्याबाबत काही अडचण असल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधावा. गुगलवरून बँकेचा संपर्क क्रमांक घेतला असल्यास तो संबंधित बँकेचाच असल्याची खात्री करावी.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या मदतीच्या अनुषंगाने जनधन खात्याबाबत चोर माहिती विचारू शकतात. अशा फेककॉल व मॅसेजपासून नागरिकांनी सावध राहावे. सोशल मीडियाच्या हालचालीवर सायबर सेल लक्ष ठेवून असून, अधिक माहितीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक वी.पी. इंगळे यांनी केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Karanja can be expensive if you provide bank account information from mobile