esakal | कावड-पालखी उत्सवात एकच मानाची पालखी, धारगड यात्रेलाही एकच पथक, शिवभक्तांच्या बैठकीत निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Kawad-Palkhi festival with one standard palanquin, Dhargad Yatra with one team, decision in meeting of Shiva devotees

अकोल्यातील राजराजेश्‍वर मंदिराच्या कावड-पालखी सोहळ्याला 76 वर्षांची परंपरा आहे. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही पंरपरा खंडीत होण्याची शक्‍यता होती. त्यासाठी पालकमंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. यंदा हा उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा व परंपरेचे पालन कसे, करावे याबाबत राजराजेश्वर मंदिर समिती, कावड व पालखी मंडळे यांनी समन्वयाने निर्णय घेऊन प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.

कावड-पालखी उत्सवात एकच मानाची पालखी, धारगड यात्रेलाही एकच पथक, शिवभक्तांच्या बैठकीत निर्णय 

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला  ः राज्यात प्रसिद्ध असलेल्या अकोला येथील राजराजेश्‍वर मंदिरातील कावड-पालखी उत्सवाची परंपरा यावर्षी कोरोनाच्या सावटात खंडीत होणार नाही याची काळजी घेत एकाच मानाच्या पालखीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रावणातील शेव'टच्या सोमवारी हा पालखी सोहळा होतो. याशिवाय तिसऱ्या सोमवारी आयोजित धारगड यात्रेलाही परवानगी नाकारण्यात आली असून, केवळ पूजा-अर्चा करणाऱ्या एका पथकालाच मंदिरापर्यंत जाण्यास मंजुरी देण्यात आली.

पालकमंत्री बच्चू कडू, कावड-पालख मंडळाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये बुधवारी जिल्हा नियोजन भवनात झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोल्यातील राजराजेश्‍वर मंदिराच्या कावड-पालखी सोहळ्याला 76 वर्षांची परंपरा आहे. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही पंरपरा खंडीत होण्याची शक्‍यता होती. त्यासाठी पालकमंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. यंदा हा उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा व परंपरेचे पालन कसे, करावे याबाबत राजराजेश्वर मंदिर समिती, कावड व पालखी मंडळे यांनी समन्वयाने निर्णय घेऊन प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.

कावड यात्रोत्सवासंदर्भात बुधवारी आयोजित बैठकीत शिवभक्तांनी परंपरा खंडित होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर ही परंपरा कायम राखण्यासाठी मानाच्या पालखीलाच परवानगी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तेही थेट गांधीग्राम येथे जाऊन कावड वाहनाने अकोला येथे राजेश्‍वर मंदिरात आणून जलाभिषेक करीत कावड यात्रेची परंपरा कायम राखण्यास परवानगी देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपिकीशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
 
धारगड यात्रेहाली परवानगी नाही
अकोला, बुलडाणा आणि वाशीमसह अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या अकोट तालुक्‍यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या धारगड येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भाविक लाखोंच्या संख्येने जात असतात. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मात्र धारगड यात्रेला परवागनी नाकारण्यात आली आहे. धारगड येथील तिसऱ्या सोमवारी पूजा करून दर्शन घेण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी दरवर्षी येथे पूजा करणाऱ्या मोजक्‍या व्यक्तींना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)