Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची भरधाव धडक; सेंट्रिंग कामगार गंभीर जखमी, पायावर शस्त्रक्रिया, मोटार वाहन कायदा व बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल
Thar crashes into bike in Akola; worker seriously injured

Thar crashes into bike in Akola; worker seriously injured

Sakal

Updated on

अकोला : केशवनगर परिसरात भरधाव थार वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सेंट्रिंग कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. या अपघातप्रकरणी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे महाराष्ट्र सहसचिव असल्याचे सांगितले जाणारे सोनू उर्फ प्रविण चंद्रकांत वाटमारे यांच्याविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातात राहुल मधुकर कांबळे (४९) यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com