हिवरखेड (अकोला) - ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सन २०१६ पासून अकोला, हिवरखेड, खंडवा हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होता. गत नऊ वर्षांपासून रेल्वेप्रेमी नागरिक व प्रवासी हा मार्ग पूर्ण होण्याची चातकाप्रमाणे वाट बघत होते. आता रेल्वेप्रेमींचे स्वप्न युद्ध स्तरावर पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे.