अकाेला : शिकस्त पूल देताहे अपघाताला निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Khirkund Mardi road bridge damage

अकाेला : शिकस्त पूल देताहे अपघाताला निमंत्रण

रुईखेड : अकोट तालुक्यातील आदिवासी भागातील, तसेच सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खिरकुंड मार्गावरील शिव नाल्यावरी पूल शिकस्त झाला असून गत एक वर्षापासून वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात होण्याची वाट संबंधित विभाग पाहत आहे का?, असा प्रश्‍न खिरकुंड व मार्डी येथील ग्रामस्थांना पडला आहे.

गत एक वर्षापासून पुलाची खुप दुर्दशा झाली असल्यावरही संबंधित विभाग या पुलाच्या बांधकामाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. खिरकुंड ते मार्डी हा मुख्य रस्ता असल्याने याच रस्त्यावर आणखी पाच ते सहा गावांचा संपर्क जोडल्या जाते. याच गावांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रुईखेड व अकोट येथील शाळेत येतात. या रस्त्यावरून प्रवास करताना त्यांनाही आपला जीव मुठीत घेऊनच शाळा गाठावी लागते. गत दोन वर्षांपासून या रस्त्यावरील महामंडळाची एसटी बंद होती. आता शाळा नियमित सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेच्या दिशेने ओढू लागले आहेत.

परंतु, पुलाखालील पाईप पुलाखालून निघून गेल्यामुळे बस खिरकुंड व इतर गावाकडे पोहचू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी कसे जावे?, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला आहे. यंदा एखादा पूर आला तर हा रस्ता पूर्ण बंद होणार आहे, तरी संबंधित विभागाने तातडीने पुलाचे काम करावे, अशी मागणी खिरकुंड व परिसरातील इतर गावांमधील ग्रामस्थांकडून केल्या जात आहे. खिरकुंड धरण हे निसर्गरम्य वातावरणाचे ठिकाण आहे. हे धरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. पुलाची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी नागरिक येण्याचे टाळणार आहेत.

आम्ही वर्षभरापासून संबंधित विभागाकडे या पुलाची दुरुस्तीची मागणी केली असून, आतापर्यंत कुठल्याच प्रकारचे काम संबंधितांनी केले नाही.

- शोभा कासदे, सरपंच, खिंरकुड.

सर्वांनाच रस्त्यावरील पुलामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.

- हरिराम कासदे, ग्रामस्थ, खिंरकुड.

Web Title: Akola Khirkund Mardi Road Bridge Damage Construction Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..