अकाेला : कुरणखेडच्या महिलांनी पाठवल्या सैनिकांना राखी

‘धागा शौर्य का राखी अभियानात’ महिला व विद्यार्थिनींचा सहभाग
Akola Kurankhed women sent Rakhi to soldiers
Akola Kurankhed women sent Rakhi to soldiers
Updated on

कुरणखेड - देशाचे सरंक्षण करणारे सैनिक विविध सण-उत्सहात आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकत नाहीत. भाऊ, बहिणीच्या पवित्र नात्यातील राखीबंधनातही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही, अशा अनेक सैनिक भावांसाठी ‘धागा शौर्य का राखी अभियान’ अंतर्गत कुरणखेड येथील महिला व विद्यार्थिनिंनी आपल्या हाताने बनवलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवल्या.

रक्षाबंधन उत्सव हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र भारत मातेचे रक्षण करणाऱ्या देशाचे सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबासोबत उत्सवात होता येत नाही. परंतु, सीमेवरील सैनिकांना आपल्या बहिणीच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी कुरणखेड येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश विजयकर, रंजित घोगरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘धागा शौर्य का राखी अभियान’ अंतर्गत परिसरातील महिला, विद्यार्थिनिंना राख्या गोळा करण्यासाठी आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत कुरणखेड येथील महिला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ताणखेड येथील विद्यार्थ्यांनी स्वकलेतून निर्मित राख्या गोळा करून व सैनिकांप्रति आदरभाव पत्र लिहून त्या राख्या पोस्टामार्फत सीमेवर तैनात असलेल्या जम्मू-काश्मीर, देहरादून येथील सैनिकांना पाठवल्या. याबाबत येथील पोस्ट ऑफिसमध्ये आज छोटेखाणी कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्या सुषमा ठाकरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच तृप्ती देशमुख, शिक्षिका अनिता पवार, पोस्ट मास्टर दत्तात्रय देशमुख, राजेश चोपडे, माधुरी देशमुख, रीना बरडे, संजीवनी देशमुख, सविता फाटे, सुशिला लव्हाळे, वनमाला देशमुख, रत्नप्रभा दहिकार, वेनू हरसुलकर, रोशनी गायकवाड, दुर्गा आठवले, दीपा आठवले, प्रमिला मालवे, वंदना कोगदे, वंदना इंगळे, लता चिकार, रोशनी मालाणी, शिल्पा ढोकणे, सारिका धानोरकर, राधिका देशमुख, तेजस्विनी तेलकर, राधिका बोळे, काजल सोनोने, सुनिता घाटे, कल्याणी चिकार, मीरा माल्टे, सिद्धी राऊत, सुगंधा शिंदे, नूतन बाहेकर, आचल चिकार, स्मिता सोनोने, भक्ती तेलकर, उज्ज्वला जाधव, तन्वी तायडे, राधा कुपटकर, कांचन कुपटकर, प्रतिभा राऊत, प्रणाली राऊत, भाग्यश्री देशमुख, सानिका टेकाडे, कांता बोळे, जानवी उमाळे, जयश्री बोळे, आकांक्षा टेकाडे, नीता चिकार, रेखा चव्हाण, साक्षी सोनोने, कोमल उमाळे, स्नेहल कोगदे, सारिका धानोरकर, साक्षी आठवले, ऋचा फाटे, गौरी ढोकणे, गायत्री सदाफळे, निशा चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक प्रदीप बोळे, सैनिक सतीश गायकवाड, सैनिक आकाश कथलकर, चंडिका आपत्कालीन बचाव पथकाचे विरेंद्र देशमुख, संतोष गोगटे, प्रमोद गोगटे, नरेंद्र देशमुख, शुभम चव्हाण, मयूर धानोरकर, कृष्णा सोनोने यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आदर्श शिक्षक अरविंद उगले यांनी, आभार योगेश विजयकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com