
अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे २०५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असल्याचे आहे. लोकसंवाद व पाठपुराव्यातून कामाला गती द्यावी, असे निर्देश ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी (ता.३०) दिले. नियोजनभवनात आयोजित मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.