Akola News: महसूल कॉलनीत उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू; भूमिगत गटार कामामुळे नागरिकांना दिलासा

Road Resurfacing Begins in Mahasul Colony: अकोला महसूल कॉलनीतील उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू, नागरिकांना दिलासा. भूमिगत गटार योजनेमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने कामाला गती दिली.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: महसूल कॉलनी परिसरातील भूमिगत गटार योजनेच्या संथ कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच महानगरपालिका प्रशासनाने अखेर काम सुरु केले आहे. गेल्या महिनाभरापासून उखडलेल्या अवस्थेत असलेल्या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com