

अकोला : राज्यातील भाजप सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी सकल गरजवंत मराठा समाजातर्फे मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेष आंदोलन करण्यात आहे. इतिहासाचे विकृतीकरण व महापुरुषांच्या बदनामीचा निषेधही यावेळी करण्यात आला.