esakal | पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News -A 24-year-old girl was tortured in a moving bus

चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत. 

पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशिम : महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार थांबण्याचं काही नाव घेत नाही. दररोज अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. नुकतीच गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत. 

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

संबंधित तरुणीवरील बलात्काराची घटना 6 जानेवारीला घडलीय. या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे.

आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन  बलात्कार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

दरम्यान, पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यासंदर्भात एपीआय महल्ले यांच्या नेतृत्वात पोलिस पथक नागपूरात दाखल झाले असून त्यांना आरोपीचा पत्ता मिळाला. परंतु आरोपी फरार असल्याची माहिती ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान घटनेचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत. 

(संपादन - विवेक मेतकर)

loading image