esakal | कोरोनाचे ८०८ ॲक्टिव्ह रूग्ण,  कोरोनाग्रस्तांमध्ये नव्या ४६ रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News - 808 active patients of Corona, 46 new patients added to Corona

कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ४६ नवे रुग्ण रविवारी (ता. ७) आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडली असून जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८०८ झाली आहे.

कोरोनाचे ८०८ ॲक्टिव्ह रूग्ण,  कोरोनाग्रस्तांमध्ये नव्या ४६ रुग्णांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ४६ नवे रुग्ण रविवारी (ता. ७) आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडली असून जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८०८ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. ७) जिल्ह्यात २६७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २२१ अहवाल निगेटिव्ह तर ४६ अहवाल पॉझिटिव्ह आले. संबंधित रुग्णांमध्ये २० महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, मलकापूर व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, जवाहर नगर, शास्त्री नगर, रणपिसे नगर, डोंगरगाव व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभूळगाव, खडकी, कौलखेड, गणेश नगर, आनंद नगर, खोलेश्वर, दुर्गा चौक, तेलिवेताळ ता. पातूर, जठारपेठ, विवेकानंद कॉलनी, गोरक्षण रोड, कव्हर नगर, गजानन पेठ, तापडीया नगर, न्यू भागवत प्लॉट, खेडकर नगर, घोडेगाव ता. तेल्हारा, उगवा, आदर्श कॉलनी, चांदुर, अकोट फाईल, बार्शीटाकळी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे.

१९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेंसी येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले एक अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ११८३८
- मृत - ३३८
- डिस्चार्ज -१०६९२
- ॲक्टिव्ह रुग्ण - ८०८

(संपादन - विवेक मेतकर)

 

loading image