esakal | आधारच अपडेट नाही तर कशी मिळणार कर्जमुक्ती, अजून चार हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Aadhaar is not an update, but how to get debt relief, Aadhaar update of four thousand farmers left

 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू असून योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ जानेवारी अखेर ४ हजार १३५ खातेदारांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही. अशा पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण तातडीने करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एस.डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे.

आधारच अपडेट नाही तर कशी मिळणार कर्जमुक्ती, अजून चार हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू असून योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ जानेवारी अखेर ४ हजार १३५ खातेदारांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही. अशा पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण तातडीने करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एस.डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत यापूर्वी विशिष्ट क्रमांकासह कर्ज खाती सहा याद्या आधार प्रमाणिकरणासाठी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झालेल्या आहेत. तसेच १ जानेवारी रोजी विशिष्ट क्रमांकासह सातवी यादी आधार प्रमाणिकरणासाठी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झालेली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांची प्राप्त झालेली नवीन यादी बँकेत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व जिल्ह्यातील लाभार्थी यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले संबंधित बँकेशी संपर्क साधून आपले नाव सातव्या यादीमध्ये आलेले असल्यास जवळच्या सी.एस.सी. किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.

हेही वाचा - ना दुरुस्ती, ना आंदोलन, ना कारवाई, पाणी मुरले कुठे?

आधार प्रमाणिकरण संदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बॅंकेचे शाखा व्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उपसहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजनेत पाच हजार शेतकरी लाभापासून वंचितच!

दोन लाखांपर्यंतची थकीत रक्कम होते वर्ग
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत व्याजासह दोन लाखापर्यंत थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image