
औरंगाबाद शहर नामांतरचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. याबाबत मंगळवारी अकाेल्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नामांतराचे राजकारण करू नका असा टोला सरकारमधील मित्रपक्षाला लगावला. नामांतरापेक्षा विकास कामांना अधिक महत्त्व द्यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
अकोला, : औरंगाबाद शहर नामांतरचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. याबाबत मंगळवारी अकाेल्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नामांतराचे राजकारण करू नका असा टोला सरकारमधील मित्रपक्षाला लगावला. नामांतरापेक्षा विकास कामांना अधिक महत्त्व द्यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
अकोला जिल्ह्यातील शेतकरी दिल्ली येथील आंदाेलनात सहभागी हाेण्याची रवाना झाले. यानिमित्त ठाकरे अकाेल्यात आले असतान त्यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना नामांतराच्या मुद्यावर भाष्य केले. नामांतराबाबत सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला हाेता. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार विकास हा महत्त्वाचा आहे. शहराचे नाव बदलवणे हा महत्त्वाचा मुद्दा नाही. शहर नामांतरावरून काेणाच्याही नाराजीचा विषयच नाही. या विषयाला मतांवर डोळा ठेवून राजकारण करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - जिल्हा परिषदेचे १९ शिक्षक झाले कंत्राटी, वाचा काय असेल कारण
पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन करू
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्तीबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत माणिकराव ठाकरे यांना विचारणा केली असताना व राज्यातील पक्षाचे नेतृत्व करण्यास पुन्हा इच्छुक आहात काय, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचे पालन करू असे सांगितले. मी सात वर्ष प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पुढेही पक्ष सांगेल त्या आदेशाचे पालन करण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.
(संपादन - विवेक मेतकर)