VIDEO: अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना शहरात फिरू देणार नाही-मनसे

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 1 February 2021

कोरोना संकटकाळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे नागरिकांना अवाजवी वीज बिले देण्यात आली. या बिलांची वसुली करण्यासाठी आता महावितरणतर्फे नोटीस बजावल्या जात आहे व वीज ग्राहकांची जोडणी खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.

अकोला: कोरोना संकटकाळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे नागरिकांना अवाजवी वीज बिले देण्यात आली. या बिलांची वसुली करण्यासाठी आता महावितरणतर्फे नोटीस बजावल्या जात आहे व वीज ग्राहकांची जोडणी खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.

या सर्व प्रकारांचा विरोध करीत सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या रतनलाल प्लॉट येथील विद्युत भवनाजवळ नोटीस पाडण्यात आल्या व अवाजवी वीज बिलासह नोटीसची होळी करण्यात आली.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

त्यापूर्वी अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणतर्फे बजावण्यात आलेल्या नोटीस परत घेण्याची व पुन्हा नोटीस न देण्यासंदर्भात विनंती केली.

हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक; डॉ. संतोष कोरपे यांच्यासह ७ संचालक अविरोध, ११ उमेदवारी अर्ज नामंजूर

असे प्रकार आढळून आल्यास महावितरणच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना शहरात फिरू देणार नाही असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला. हे आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Awesome electricity bill on behalf of MNS Holi at Akola Pankaj Sable