esakal | बर्ड फ्ल्यूचा धोका; ३५० पक्षांचे नमुने निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Danger of bird flu; Samples of 350 parties are negative

 राज्यात गत सात-आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सदर विषाणूसह आता राज्यात बर्ड फ्लूचा सुद्धा शिरकाव झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

बर्ड फ्ल्यूचा धोका; ३५० पक्षांचे नमुने निगेटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : राज्यात गत सात-आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सदर विषाणूसह आता राज्यात बर्ड फ्लूचा सुद्धा शिरकाव झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

त्याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात पोल्ट्री फार्म मधील ३५० पक्षांचे सिरो (नासिकाग्रातील स्त्राव) नमुने रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे येथे पाठवण्यात आले.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे 25 कोटी रुपये! निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा

सदर सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यावरुन जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्ल्यू नाही, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बावने यांनी दिली.

हेही वाचा - महानगरपालिकेच्या दिव्याखालीच अंधार,अग्निशमन दलाचा कारभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर, प्रभारी अधिकारी हाकतायेत गाडा

शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा जिल्ह्यातील १२ वेगवेगळ्या ठिकाणच्या १३० पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यासाठी पशुवैद्यकांची आठ पथके तयार करण्यात आली आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top