esakal | ई-पॉस की मनस्ताप, रेशन दुकानदार व ग्राहकांची वाढली डोकेदुखी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News E-pos key heartache, increased headaches of ration shopkeepers and customers

 रास्त भाव धान्य दुकानदार व ग्राहकांसाठी ई-पॉस मशीन डोकेदुखी ठरत असून, सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्याच्या व शिधापत्रिकाधारकांना वेळेवर राशन मिळण्याच्या दृष्टीने ई-पॉस मशीन अद्यावत करणे गरजेचे आहे.

ई-पॉस की मनस्ताप, रेशन दुकानदार व ग्राहकांची वाढली डोकेदुखी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) :  रास्त भाव धान्य दुकानदार व ग्राहकांसाठी ई-पॉस मशीन डोकेदुखी ठरत असून, सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्याच्या व शिधापत्रिकाधारकांना वेळेवर राशन मिळण्याच्या दृष्टीने ई-पॉस मशीन अद्यावत करणे गरजेचे आहे.

शासनाने २०१३ पासून राज्यभरातील प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानावर राशन ई-पॉस मशीनद्वारा धान्य वितरणास सुरुवात केली. या प्रणालीला ७ वर्षे पूर्ण झाली असून, ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. बहुतांश ई-पॉस मशीन बिल निघताच नेटवर्क गायब होऊन बंद पडतात.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

याचा त्रास शिधापत्रिका धारक व रेशन दुकानदारांना होत आहे. तालुक्यात राशन दुकानदार व ग्राहकांना धान्य घेतांना या मशीन मुळे डोके दुखी होत आहे. नेहमीच या ई-पॉस मशीनचे नेटवर्क गायब होते.

हेही वाचा - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी

कधी-कधी ई-पॉस मशीनवर ग्राहकांचे थंब बरोबर लागत नाहीत. या सगळ्या अडचणींवर मात करणारी यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास तसेच किमान नवीन ४ जी, ५ जी च्या ई-पॉस मशीन प्रत्येक धान्य दुकानावर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

शासनाने पुरविलेल्या ई-पॉस मशीन ३ जी नेटवर्क जोडणाऱ्या असून, त्या कालबाह्य झाल्या आहेत. ॲक्टीव्ह होत नाहीत. दुकानदार व ग्राहकांना मनस्ताप होतो. नवीन ४ जी, ५ जी च्या उपलब्ध करून द्याव्यात. मनस्ताप दूर होईल.
-कैलास महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!