esakal | चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Four officers promoted as police inspectors!

पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांची सेवाजेष्ठतेप्रमाणे माहीती मागवून त्यातील ४३८ अधीकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी बढती दिली आहे.

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांची सेवाजेष्ठतेप्रमाणे माहीती मागवून त्यातील ४३८ अधीकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी बढती दिली आहे.

यामध्ये अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील शुभांगी मुकुंद कोरडे-दिवेकर, राज्य गुप्तवार्ता येथील वैशाली आढाव तर अकोला पोलिस अधीक्षक कार्यालय आस्थापनेवरील संग्रामसिंग पाटील, गजाननसिंग बायसठाकुर या ४ अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.

हेही वाचा - कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट

पदोन्नतीवर  शुभांगी कोरडे-दिवेकर यांची पोलिस प्रशिक्षण येथून जिल्हा जात पडताळणी समिती अकोला,  वैशाली आढाव यांची राज्य गुप्तवार्ता येथून पोलीस महासंचालक कार्यालय मुबंई, संग्रामसिंग पाटील व गजाननसिंग बायसठाकुर यांची मुबंई येथे  बदली करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली येथून नरेंद्र देशमुख यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

loading image