‘आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 6 January 2021

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

अकोला : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पाची तरतुद 165 कोटींची, खर्च फक्त 15 कोटी 60 लाखांचा

त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर प्रहार केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भाजपवर केली आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तसेच भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News MLA Amol Mitkari criticizes BJP over Aurangabad renaming