
तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची चौकशी होणार ही अटकळ होती. या योजनेच्या कामात अनेक तक्रारी शासन दरबारी झाल्या, अनेक आंदोलनाचे इशारे देण्यात आले. परंतु, कोणत्याही कामाची चौकशी झाली नाही. ना दुरुस्ती, ना आंदोलन, ना कारवाई, मग रस्त्याच्या कामात पाणी मुरले कुठे, असा प्रश्न जनतेत निर्माण होत आहे.
मानोरा (जि.वाशीम) : तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची चौकशी होणार ही अटकळ होती. या योजनेच्या कामात अनेक तक्रारी शासन दरबारी झाल्या, अनेक आंदोलनाचे इशारे देण्यात आले. परंतु, कोणत्याही कामाची चौकशी झाली नाही. ना दुरुस्ती, ना आंदोलन, ना कारवाई, मग रस्त्याच्या कामात पाणी मुरले कुठे, असा प्रश्न जनतेत निर्माण होत आहे. मानोरा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा बट्ट्याबोळ वाजविला जनुना ते चौसाळा, कुपटा ते चौसाळा, शेंदूरजना ते रुई तालुक्यातील इतरही कामे रस्ताच्या कामाची चौकशी करावी, अशा तक्रारी कार्यकारी अधिकारी वाशीम यांना देण्यात आल्या. इतर अधिकारी पदाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परंतु, या रस्त्याच्या कामाची कोणीही दखल घेतली नाही. कारवाई करण्यात आली नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामात अनियमितता झाली, अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेते उमेश पाटील ठाकरे निवेदन दिले. हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा हे निवेदन विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना सुध्या देण्यात आले तरी पण संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची चौकशी केल्यास निश्चित अपहार केल्याची घटना समोर येईल, असे नागरिकांकडून मत व्यक्त केले जात आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||