सात ठिकाणी महिला सरपंच व सहा गावात महिला उपसरपंच

Akola Marathi News Murtijapur taluka women sarpanch in seven places and women deputy sarpanch in six villages
Akola Marathi News Murtijapur taluka women sarpanch in seven places and women deputy sarpanch in six villages

मूर्तिजापूर (जि.अकोला)   : मूर्तिजापूर तालुक्यातील नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या २९ पैकी १४ ग्राम पंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका आज घेण्यात आल्या त्यापैकी सहा बिनविरोध झाल्या, तर सात ठिकाणी महिला सरपंच व सहा ठिकाणी उपसरपंच झाल्या. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये पारद, भटोरी, गोरेगाव, टिपटाळा, सोनोरी (बपोरी) आणि कुरूम ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीनुसार ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होऊन गेल्या १५ जानेवारीला २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली.


आज पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार पारदच्या सरपंचपदी विनोद मानकर व उपसरपंचपदी चंदा नाजुक खंडारे यांची निवड झाली. भटोरीच्या सरपंचपदी छबुताई भाऊराव मुरळ व उपसरपंचपदी वर्षा रविंद्र भोंगळे यांची निवड झाली. मंगरुळ कांबे सरपंच सुभाष वाकोडे, उपसरपंच अभय कांबे, गोरेगाव अशोक सरदार व शेख निकत अंजुम फयाजोद्दीन, सिरसो जयकुमार तायडे व वनिता अनंत दाभाडे, लाखपुरी अजय तायडे व राजप्रसाद कैथवास, दुर्गवाडा संतोष गवई व चित्रा सतिश पंडित, सांगवी अर्चना दिलीप खोकले व प्रशांत खांडेकर, टिपटाळा जयश्री सुनिल डोंगरे व प्रियंका आमोल गावंडे, हिरपूर अमोल गडवे व काजोल रविकुमार शिंदे, कवठा (खोलापुर) आरती प्रफूल्ल देशमुख व अरुणा गोवर्धन डोंगरदिवे, सोनोरी (बपोरी) किरण नितिन काळे व गोपाळ राणूजी चुडे, कुरुम अतुल वाट व इम्रान खान साजिद खान आणि माटोडा च्या सरपंचपदी जिजाबाई सुखदेव खंडारे व उपसरपंचपदी रामराव मेश्राम यांची निवड झाली. उर्वरित १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक गुरूवारी (ता.११) होईल.


या निवडणुकांचे अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी रामराव जाधव, विस्तार अधिकारी पंडित राठोड, बंडू पजई, सुरेश तिजारे, मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर, विस्तार अधिकारी विलास चव्हाण, मंडळ अधिकारी महेश नागोलकर, विस्तार अधिकारी मनोज बोपटे, युवराज अंभोरे, विजय किर्तने, मंडळ अधिकारी सुनिल डाबेराव, रावसाहेब पाटेकर, सदानंद देशपांडे, राजेंद्र जाधव यांनी काम पाहिले.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com