ढगाळ वातावरणा सह बरसल्या पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 6 January 2021

आकाशात सोमवारी (ता.४) पासूनच ढग जमा व्हायला लागले होते. हिवाळा असूनही मंगळवारी (ता.५) सकाळी पावसाच्या सरी बरसल्यात. त्यामुळे आपल्या शेतातील पिकांची काळजी असलेल्या शेतकऱ्यांची अचानक बदलत्या वातावरणामुळे मोठी घालमेल झाली.

शिरपूर जैन (जि.वाशीम) :आकाशात सोमवारी (ता.४) पासूनच ढग जमा व्हायला लागले होते. हिवाळा असूनही मंगळवारी (ता.५) सकाळी पावसाच्या सरी बरसल्यात. त्यामुळे आपल्या शेतातील पिकांची काळजी असलेल्या शेतकऱ्यांची अचानक बदलत्या वातावरणामुळे मोठी घालमेल झाली.

पावसाच्या सरी बरसल्यामुळे त्याचा पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अजून हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेचे १९ शिक्षक झाले कंत्राटी, वाचा काय असेल कारण

सध्या हिवाळा सुरू असून तुरीचे पीक पूर्णत्वाकडे आहे. जेमतेम आलेले तुरीचे पीक वाचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड आहे. त्यात पावसाने गजब केल्यास निश्चितच पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली आहे. ऐन हिवाळ्यात धुई, धुके यासह पावसाच्या सरी बरसत असल्याने त्याचा फटका पिकावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळी पावसाच्या सरी बरसल्या नंतर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. शेतकऱ्यास वेठीस धरणारा निसर्ग शेवटी काय करेल? हे सांगता येत नाही.

हेही वाचा - अर्थसंकल्पाची तरतुद 165 कोटींची, खर्च फक्त 15 कोटी 60 लाखांचा

दोन आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरुन किमान तापमान दहा ते १२ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. परंतु, गेल्या दोन दिवसात वातावरणात बदल झाला असून, आर्द्रतेचा टक्का वाढण्यासोबतच थंडीचे प्रमाणही कमी-अधिक झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा उशिराच झाली. परंतु, पर्जन्यमान अपेक्षेपेक्षा अधिक झाले. त्यामुळे यंदा हिवाळ्यात गारवा अधिक जाणवेल. 

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पिकांना धोका
वातावरणात अचानक बदल झाल्याने व तापमान वाढल्याने पिकांवर कीडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, वेळीच आवश्‍यक ते व्यवस्थापन, उपाययोजन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Rain showers with cloudy weather