esakal | कापूस ग्रेडिंगमधील अडचणी दूर करा- शेतकरी जागर मंच
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Take away the problems in cotton grading - Shetkari Jagar Manch

कापूस खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये होणाऱ्या अडचणी दूर करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे व शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे यांनी एका निवेदनाद्वारे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.

कापूस ग्रेडिंगमधील अडचणी दूर करा- शेतकरी जागर मंच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कापूस खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये होणाऱ्या अडचणी दूर करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे व शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे यांनी एका निवेदनाद्वारे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.

कापूस खरेदीत होणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दिरंगाईस आळा घालण्याकरिता कापूस खरेदी केंद्र सीसीआय, कॉटन फेडरेशन येथे कापसाची हमी किंमत ५८५० रुपये असून, ती सीसीआय व फेडरेशनद्वारे शेतकऱ्यांना ५६१५ रुपये किंवा ५५२५ रुपये एवढीच दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल नुकसान होत असून, कापूस गाडी व ट्रॅक्टर मोजण्याकरिता दोन ते तीन दिवस लागत आहेत. याकरिता अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले जावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे व शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image