

अकोला: शहरातील प्रमुख बाजारपेठांसह गल्लीबोळांमध्ये दुकानदारांचे अतिक्रमण बिनधास्त वाढत असून मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून केवळ थातूरमातून कारवाया केल्या जात आहेत. बारा मीटर रुंदीचे रस्ते अतिक्रमणामुळे आठ मीटरवर आले असून वाहनधारक, ग्राहक आणि पादचारी यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक कोंडीचे चित्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे.