Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Four Months of Unpaid Wages: अकोल्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये कार्यरत ११० माथाडी कामगारांची जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांची ६० ते ७० लाख रुपयांची मजुरी रखडली असून त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.
Akola

Akola

esakal

Updated on: 

अकोला: शासकीय धान्य गोदामांमध्ये दिवस-रात्र राबून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे चाक अखंड फिरते ठेवणाऱ्या माथाडी कामगारांच्या आयुष्यात मात्र सध्या अंधार दाटला आहे. रेशनद्वारे लाखो नागरिकांच्या ताटात अन्न पोहोचविण्यासाठी घाम गाळणाऱ्या ११० माथाडी कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळालेला नाही. जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील तब्बल ६० ते ७० लाख रुपयांची मजुरी थकीत असल्याने अनेक कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक विवंचना ओढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com