

Akola News
esakal
अकोला: शहरातील वाढत्या धुळीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच मुख्य रस्त्यांवरील स्वच्छता अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महानगरपालिकेला शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत तीन अत्याधुनिक मेकॅनिकल स्वीपींग मशीन प्राप्त झाली आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांची सफाई अधिक वेगवान, प्रभावी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात येणार आहे.