

Akola News
esakal
अकोला: जिल्ह्यात मे महिन्याच्या कडक उन्हाने कहर केला असून तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उष्णतेतही ग्रामीण भागातील हजारो मजूर रोजगारासाठी कामावर हजेरी लावत आहेत.
शेतीची कामे ठप्प झाल्याने मजुरांचा कल पुन्हा एकदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे (मनरेगा) वळला असून जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक कामांवर दररोज सरासरी दहा हजारांवर मजूर काम करत असल्याचे चित्र आहे.