
Akola MIDC Theft
Sakal
अकोला : शहरातील औद्योगिक क्षेत्रात लाखोंचा माल चोरीस जातो आणि पोलिसांना दोन महिने उलटूनही आरोपी सापडत नाहीत, तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे धाव घ्यावी? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, तर एमआयडीसी पोलिसांवरील उरलेला विश्वास संपुष्टात येईल, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने नोंदवली आहे.