

Violent Clash in Mothi Umri Over Old Rivalry
Sakal
अकोला : सिव्हील लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोठी उमरी परिसरात जुन्या वैमनस्यातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दुपारी रौनक मंगल कार्यालयाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात भरती केले आहे.