अकाेला : वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे माझोडवासी त्रस्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB Electricity

अकाेला : वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे माझोडवासी त्रस्त!

माझोड : निंबी सबस्टेशन वरून चिखलगाव गावठाण फिडर अंतर्गत येणाऱ्या माझोड येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. येथे एका नवीन विद्युत रोहित्राची आवश्यकता असून, एका डीपीवर जास्त लोड आला की सदर डीपी आपोआपच बंद (ड्रीप) पडत असल्याचे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे माझोड गावात नवीन डीपीची अत्यंत आवश्यकता आहे.

जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या आशेने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. दोन जुन्याना सुध्दा निवडून आणले. गेल्या दीड वर्षांपासून मात्र वीज पुरवठा नियमित होत असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावात एक नवीन डीपी आणावी ही अपेक्षा होती. ती पदाधिकारी पूर्ण करू न शकल्यामुळे ग्रामस्थांची निराशा झाली. आपापली कामे करून रात्री थकून घरी आल्यावर शांतपणे सुखाची झोप लागावी असे कुणालाही वाटतं असताना विद्युत पुरवठा बंद होत असल्यामुळे ग्रामस्थांची झोप उडात आहे.

नवीन डीपी आणण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशी मागणी मोहन तांबळे, दिनकर खंडारे, बबलू ताले, बाबुराव खंडारे, शिवा बंड, देवानंद खंडारे, श्रावण वाघमारे, गजानन ताले, विजय नेरकर, पांडुरंग बाभूळकर, सेवानंद खंडारे,बंटी थोरात, महेश गोहाळ, राजेश खंडारे, मिलिंद खंडारे, संजय खंडारे, संघपाल खंडारे, मोहन भळ,आदींसमवेत ग्रामस्थांनी केली आहे. माझोड येथे नव्याने डीपीची मागणी होत आहे. डीपीचे सहा ते साडे सहा लाख रुपये भरल्यानंतर किंवा तशी व्यवस्था झाल्यानंतर लगेच नवीन डीपी लावण्यात येईल.

- रजनीश घोपे, शाखा अभियंता, विद्युत वितरण कंपनी

Web Title: Akola Mseb Mazodwasi Electricity Supply New Dp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top