अकोला वीज ग्राहकांना महावितरणचा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला वीज ग्राहकांना महावितरणचा दणका

अकोला वीज ग्राहकांना महावितरणचा दणका

अकोला : वारंवार स्मरण करून देखील वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अकोला शहरातील वीज ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला. जुन्या शहर परिसरातील २२३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा नवीन वर्षातील पहिल्याच सोमवारी (ता.३) खंडित करून थकबाकीदार वीज ग्राहकांना दणका दिला.

हेही वाचा: नागपूर : ओमिक्रॉनसह कोरोनाचे संकट

थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली असून, शहरातील अन्य भागात येणाऱ्या दिवसात अशीच कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांनी वीज देयकांचे पैसे न भरता परस्पर आकडे टाकून वीज पुरवठा घेतल्याचे आढळून आल्यास अशा वीज ग्राहकांच्या विरोधात थेट वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता ज्ञानेश पानपाटील, व्यवस्थापक वित्त व लेखा धनराज शेंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रभाकर दहापुते, योगेश तायडे, सहायक अभियंता योगेश राठोड, आदित्य चिखले, राजा चावरे, राजेश लोणकर, अनिल दाभाडे, विनायक शेळके, फयाजुद्दीन पटा, लेख विभागातील विकास गुल्हाने, अश्विन मेश्राम यांच्यासह जनमित्र कारवाईत उपस्थित होते.

हेही वाचा: नांदेड अवकाळीचा दोन हजार हेक्टरला फटका

सोमवारी वानखेडे नगर, लकडगंज, पिंजारी गल्ली, भीम नगर, नेहरू नगर, गजानन नगर, शिवसेना वसाहत, खिडकीपुर, हरिहर पेठ या परिसरातील २२३ थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. या थकबाकीदार वीज ग्राहकांकडे १९ लाख ९३ लाख रुपयांची थकबाकी होती. ११७ वीज ग्राहकांनी कारवाईचा बडगा उगारताच तातडीने ७ लाख ६३ हजार रुपयांचा भरणा केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaPowerMSEDCL
loading image
go to top