
अकाेला : मेहकर आगारातून चाळीस लांब पल्ल्याच्या फेऱ्या
मेहकर : राज्य परिवहन महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून मेहकर आगाराने पुणे, नागपूर, नांदेड, लातूर,पंढरपूर, जळगाव खानदेश आदी ठिकाणी जाण्यासाठी चाळीस लांबपल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मेहकर आगार हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आगार असून येथून प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व जलद मार्गांवर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे सकाळी ७, ८, १८, १९.३० वाजता, औरंगाबादसाठी सकाळी ६, ७, ८, ८.३०, ११, १८, १९.५० वाजता, लोणार मार्गे पुणे ६.३०, नागपूरसाठी सकाळी ७.३०, ८.३०, ९, ११.२०, १२, २० वाजता, पंढरपूर ८.१५, लातूर ९.४५ वाजता, चांगेफळ मार्गे औरंगाबाद ७.१५, ७.४५, जळगाव खानदेश ६, ७, ८.३०, ९ वाजता, नांदेड ७.१५ वाजता, त्र्यंबकेश्वर सकाळी ७ वाजता आदी जवळपास चाळीस लांब पल्ल्याच्या फेऱ्या आगाराने सुरू केल्या आहेत.
बुलडाणा, लोणार, खामगावसाठी दर अर्ध्या तासाने तर रिसोड दर एक तासाने नव्या फेऱ्या कार्यान्वित करण्यात आल्या आहे. रिसोड, पुसद, वाशीम, दिग्रस, अकोला, जालना, नागपूर आगारांच्या या व्यतिरिक्त अनेक बसेस मेहकरवरून जात येत असतात. लांब, मध्यम लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी केले आहे. मेहकर आगाराचे कार्यक्षेत्र मेहकर, लोणार, सिंदखेडराजा अशा तीन तालुक्यांचे आहे.
डोणगाव, सिंदखेडराजा, लोणार, जानेफळ येथून ग्रामीण भागासाठी प्रत्येकी दोन बस देण्यात आल्या असून बसेसची उपलब्धता वाढली की, ग्रामीण भागासाठी अधिक बस सुरू करण्यात येतील.
- रणवीर कोळपे, आगार व्यवस्थापक, मेहकर.
Web Title: Akola Msrtc Mehkar Depot Transportation Forty Bus Started At Full Capacity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..