Akola muncipal corporation election Reservation announced without OBC
Akola muncipal corporation election Reservation announced without OBCsakal

अकोला : ओबीसीशिवाय आरक्षण जाहीर

४६ महिलांसाठी जागा राखीव हरकतीसाठी मिळणार सहा दिवस

अकोला : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका निवडणूक होणार नाही, असे जाहीर केले असले तरी मंगळवारी ओबीसी आरक्षणशिवाय अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात ९१ पैकी ४६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. सामाजिक व महिला आरक्षण अंतिम होण्यापूर्वी हरकती व सूचनांसाठी ता. ६ जूनपर्यंत वेळ मिळणार आहे.

अकोला महानगरपालिकेच्या ३० प्रभागातील ९१ जागांसाठीच्या महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काढण्यात आली. आयुक्त कविता द्विवेदी यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत झाली. प्रभाग रचना अधिसूचनेसोबतच प्रभागांचे सामाजिक आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार निश्चित झाले होते. त्यामुळे महिलांसाठी कोणते प्रभाग आरक्षित होतात याची उत्सुकता शिल्लक होती. तीन सदस्यीय प्रभागानुसार ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे प्रभागाचे तीन भाग पाडून आरक्षण सोडत काढण्यात आली.

कार्यकर्त्यांना कुठे उभे करायचे?

सामाजिक व महिला आरक्षण निश्चित झाल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कोणत्या कार्यकर्त्यांना कोणत्या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरावयाचे हे निश्चित झाले आहे. यात भाजप सर्वात पुढे असून, त्यापाठोपाठ काँग्रेस व शिवसेनेचा क्रम लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे मात्र अद्यापही तळ्यात मळ्यात सुरू आहे.

अशी आहे आरक्षणाची स्थिती

  • एकूण प्रभाग : ३०

  • एकूण जागा : ९१

  • महिलांसाठी राखीव : ४६

  • अनुसुचित जाती : १५ (पैकी आठ महिला)

  • अनुसुचित जमाती : दोन (पैकी एक महिला)

  • सर्वसाधारण : ७४ (पैकी ३७ महिला)

प्रभाग निहाय आरक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com