Akola News : अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी-विरोधकांचा ‘तमाशा’; चर्चा न करता ‘राजकारण’ ;विरोधी गटातील १६ नगरसेवकांचे तीन सभांसाठी निलंबन

Suspension of 16 Opposition Councillors: अकोला महानगरपालिकेतील विशेष अर्थसंकल्पीय सभेत विरोधी-विरोधकांचा गोंधळ; विकासावर चर्चा न करता राजकारण; १६ नगरसेवकांचे तीन सभांसाठी निलंबन.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शहराच्या विकासाचा रोडमॅप ठरणाऱ्या महानगरपालिकेच्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत सोमवारी (ता.३०) अभूतपूर्व गोंधळ उडाला. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर शहरातील विकासकामांवर चर्चा अपेक्षित असताना ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ या घोषणांनी सभागृह पेटले. त्यानंतर १६ विरोधी नगरसेवकांचे निलंबनाचे आदेश निघाले. मनपा प्रशासनाला पोलिस बंदोबस्त बोलाविण्याची वेळ आली व निलंबित नगरसेवकांना सभागृहाबाहेर पडावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com