Akola News: बाजार वसुलीसाठी एजन्सी ठरणार; स्थायी समितीची आज सभा ; रस्ते-पथदिवे व कर्मचाऱ्यांच्या वेतन फरकावर चर्चा

Market Collection Agency for License Fees: बाजारपेठेतील परवाना शुल्क वसुलीसाठी एजन्सी नियुक्ती आणि २५ लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या निविदांवर निर्णय घेण्याचा विषय चर्चेत राहणार आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (ता.२७) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. सभेच्या अजेंड्यानुसार शहरातील मूलभूत सुविधा, निविदा प्रक्रिया, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रश्न तसेच विविध विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय समोर ठेवण्यात आले आहेत. विशेषतः २५ लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या निविदांवर निर्णय घेणे, विविध कामांसाठी कंत्राटदारांची निवड आणि प्रशासनिक मान्यता देण्यावर निर्णय होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com